परळी इनरव्हील क्लब च्या अध्यक्षपदी सौ. शोभना सौंदळे तर सचिव म्हणून सौ.विजया दहीवाळ
परळी : परळी वैजनाथ येथील इनरव्हील क्लब च्या 2020-21 वर्षातील नूतन अध्यक्षा,उपाध्यक्षा, सचिव, ट्रेजरर,इत्यादि पदाधिकारी व सदस्यांचा पद्ग्रहन कार्यक्रम मंगळवारी दु.4-00 वाजता क्लबच्या नूतन अध्यक्षा शोभना सौन्दळे यांच्या गणेशपार जवळील राहत्या घरी संपन्न झाला. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या समस्येमुळे हा कार्यक्रम अगदी साध्या व छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला.
क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सौ अनिता धुमाळ यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षा सौ शोभना सौन्दळे यांच्या स्वाधीन केले तर क्लबच्या सचिव पदाचा पदभार सचिव मावळत्या सचिव सौ वंदना पारसेवार यांनी
क्लबच्या नूतन सचिव सौ विजया दहिवाळ यांच्याकडे सोपविला,तसेच नूतन खजिनदार सौ शैलजा बाहेती यांनी खजिनदार पदाची सूत्रे मावळत्या खजिनदार सौ सारिका सोळंके यांच्याकडून स्वीकारली, या प्रसंगी नूतन आयएसओ. सौ आशा धुमाळ,नूतन एडिटर सौ उमा समशेटे , माजी आयएसओ एड सौ शुभांगी गित्ते, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होत्या.क्लबचा नूतन उपाध्यक्षा म्हणून सौ मधुबाला कांकरिया आणि सीएलसीसी म्हणून सौ उर्मिला कांकरिया यांची निवड करण्यात आली आहे.
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी इनर व्हील क्लब तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील अशी माहिती क्लबच्या नूतन अध्यक्षा सौ शोभना सौन्दळे यांनी दिली.