परळी, आष्टी तालुक्यातील काही गाव आणि गेवराई शहरातील गणेश नगर परिसरात येथे ; कंटेनमेंट झोन महणून घेषित !!
परळी : तालुक्यातील जिरेवाडी, आष्टी तालुक्यातील धामनगाव व गेवराई शहरातील गणेश नगर परिसरात कोरोना बाधित (पाॅझिटीव्ह) रुग्ण आढळुन आले असल्याने फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) नुसार अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे तालुक्यात व इतर गावामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दभाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
गेवराई शहरातील गणेश नगर येथे 1 कोरोना पाझीटीव्ह रुग्ण आढळुन आला असल्याने प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून गणेश नगर येथील राजू सुलाखे यांचे घर ते कमलाकर पाठक यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेंनममेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथे 1 कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आला असल्याने धामनगाव कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे कंटेनमेंट झोन (Containment Zone) घोषित करण्यात आला आहे
राज्य शासनाने लॉकडाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दि. 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 144 लागू करण्यात आले आहेत.