परळीत वाईन शॉप समोर मार्किंग मद्य सम्राटांना दिलासा…!
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात राज्यात लाॕकडाउन जाहिर झाला आणी संपुर्ण व्यापार बंद झाला.त्यातली त्यात मद्य शौकिनांची झोप उडाली होती.तिसऱ्या लाॕकडाउन मध्ये माञ आॕरेंज व ग्रीन झोनमध्ये वाईन विक्रीला काही अटी शर्ती लावुन वाईन विक्रीला परवानगी दिली आहे तब्बल दिड महिना लाॕकडाउन मध्ये अडकलेल्या मद्य शौकितांना दिलासा मिळाला आहे.
काल मद्य विक्रीसाठी परवानगी दिल्याची बातमी सर्वञ प्रसारीत झाली.मद्य पिणा-यांची लगबग सुरु झाली.सोमवार पासुन वाईन विक्रीसाठी वाईनचे दुकाने सोशल डिस्टंस् साठी उपयुक्त असलेले नियम पाळण्यासाठी वाईनशाॕप समोर पाच फुटाच्या अंतरावर गोल मार्किंग आखण्यात सुरुवात केली आहे.अद्याप बीड जिल्ह्यात वाईन विक्री संदर्भात कुठलेच आदेश आले नाहीत माञ परळीतील वाईन शाॕप धारकांनी तयारी केल्याचे दिसत आहे.