परळीत युवकांचा घरोघर ‘माधुकरी’ गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ…!
परळी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने अनेकांना अनेक अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे अडल्या नडलेल्यांना अडचणी येऊ नयेत यासाठीही अनेक प्रयत्नशिल हात पुढे येत गरजुंना सर्वोतोपरी मदत करत आहेत.अशाच प्रकारे गेल्या २५ दिवसांपासून मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक गल्लीत प्रत्येक घरातून घरोघर ‘माधुकरी’ गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम राबवताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीच्या परिस्थितीत गरजुंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी नागरीक, संस्था पुढे येत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने देश व राज्यातील हातावर पोट असलेल्या नागरिकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. रोजच्या जीवनावश्यक साधनसामग्री बाबत नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीमध्ये अनेक निराश्रित, निराधार, भिक्षेकरी व विविध ठिकाणच्या अडकून पडलेल्या आधार नसलेल्या लोकांना जेवण मिळत नाही हे लक्षात घेऊन या अनुषंगाने शिवनगर (वडार काँलनी) येथील मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक पुढे आले व तत्परतेने सामाजिक कर्तव्य लक्षात घेऊन या लोकांना जेवण देण्यासाठी सरसावले.
या अतिशय बिकट व कठीण परिस्थितीत एकजुटीने प्रत्येकाने पुढे येत आपल्या गल्लीतूनच अन्न पदार्थ गोळा करून भुकेलेल्या लोकांची दोन वेळची सोय करण्याचे ठरवले. गेल्या पंचवीस दिवसांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू झाला आहे.शिवनगर (वडार काँलनी) येथील मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर , बळीराम घोगरे,दिलीप सोळंके, नवनाथ विभूते,आकाश कूंडकर, विशाल तोरडमल, राम शाहाणे, गोविंद भास्कर,चंद्रकांत वाघमारे, विशाल गवते, शिव नगर,(वडार काँलनी) व सर्व शिव नगर रहिवाशी यांचे सहकार्य लाभले आहे.दररोज हे युवक घरोघरी जाऊन पोळ्या,भाकरी, भात , भाजी एकत्र गोळा करून गरजूंना वाटप करतात. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला गल्लीतील प्रत्येक घरातून ‘माधुकरी’ गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.