LatestNewsबीड जिल्हा

परळीत भाजप व भा.ज.यु.मो.च्या वतीने गलवान घाटी येथील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण…!

परळी : गलवान घाटीत दि.15 जून रोजी भारतीय सैनिकांवर चिनी सैनिकांकडून हल्ला करण्यात आला या हल्ल्यात आपले 20 वीर जवान शहिद झाले या भ्याड हल्ल्याचा निषेध संपूर्ण भारत देशात होत आहे व तसेच या हल्ल्यात शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
परळी शहरातही भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई(टॉवर)चौकात भारतीय जवानांना दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
चिनी वस्तूंची होळी करण्यात आली व चिनी वस्तूंचा निषेध करण्यात आला.यावेळी प्रतिकात्मक चिनी राष्ट्रपती व राष्ट्रीय ध्वजावर जोडे मारून जाळण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,नगरसेवक पवन मुंडे,राजेंद्र ओझा, महादेव ईटके,रोहिदास बनसोडे,मोहन जोशी,अरुण पाठक, अनिष अग्रवाल,नरेश पिंपळे,किशोर केंद्रे,सचिन गित्ते,नितीन समशेट्टी,योगेश पांडकर,विकास हालगे,गोविंद चौरे,विजय दहिवाळ, वैजनाथ रेकने,अश्विन मोगरकर,बाळासाहेब फड,गोविंद मुंडे,फतरु भाई,श्रीपाद शिंदे,चंद्रकांत देवकते,नितीन मुंडे,पप्पू राठोड,गोविंद मोहेंकर,ताजुद्दीन शेख,वैजनाथ पवार,जितेंद्र मस्के व इतर भाजपा व भाजयुमो पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *