*परळीत कायद्याची भिती राहिली नाही* *एकाच रात्री दहा ते पंधरा गाड्यांची मोडतोड*
परळी शहरात कायद्याचा धाक राहिलेला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शनिवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार आदी भागात आपापल्या घरासमोर लावलेल्या गाड्यांची नासधूस केली आहे. गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. विशेष म्हणजे रस्त्याने आडव्या आलेल्या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. अज्ञात गुंडांनी मोटार सायकलवरून रॉडने आणि दगड – विटांनी काचा फोडून दहशत निर्माण केली. पोलीसांचा धाक राहिलेला नसल्याचे यावरून सिद्ध होते. पोलिसांनी या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन धाक कायम ठेवावा. हीच अपेक्षा.