परळीत अॕन्टीजन तपासणीत आज दिवसभरात 1321पैकी 66 पाॕझिटिव्ह

परळी वैजनाथ(प्रतिनिधी) परळी शहरात आरोग्य प्रशासनाच्या वतिने शहरातील व्यापारी कामगार भाजी विक्रेते अदी नागरिकांच्या अॕन्टीजन टेस्ट तपासणी कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्या पासुन चार बुथवर सुरु करण्यात आली सायंकाळी 6 वाजे पर्यत 1321 नागरिकांनी आपली अॕन्टीजन तपासणी करुन घेतली आहे.या 1321 पैकी 1255व्यक्ती निगेटिव्ह आढळुन आले तर 66 व्यक्ती कोरोना बाधीत आढळुन आले आहेत. बुथ क्रमाक 1]लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर येथे 301 नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 273निगेटिव्ह तर 28पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत. बुथ क्रमांक 2]सरस्वती विद्यालय येथे 255नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 250निगेटिव्ह तर 5पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत बुथ क्रमांक 3] बस स्थानक येथे 341 नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 321निगेटिव्ह तर 20 पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत बुथ क्रमांक4] प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 424 नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये 411निगेटिव्ह तर 13 पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत. उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक,तहसीलदार विपीन पाटिल,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,नोडल अधिकारी डॉ दिलीप गायकवाड अदी अधिकारी वर्गानी बुथ केंद्रावर नियंत्रण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *