Newsबीड जिल्हा

परळीतील डॉक्टरावर केलेले आरोप चुकीचे – डॉ.लोहिया,डॉ.मुंडे

परळी : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर परळीतील सर्व डॉक्टारांनी जिवाची परवा न करता येणार्‍या रूग्णाची सेवा करणे हे धर्म आहे त्या प्रमाणे सर्व डॉक्टर काम करत आहेत परंतु डॉक्टारावर झालेले आरोप हे चुकीचे आहेत.ईश्‍वर म्हणुन रूग्णाची सेवा करण्याचा डॉक्टाराचा प्रयत्न आहे. असा खुलासा परळी मेडिकल असोसिएनशनचे अध्यक्ष डॉ.एल.डि.लोहिया,सचिव डॉ.दिपक मुंडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे
प्रसिध्दीस दिलेल्या
कोरोना महामारीच्या काळात काही जणांनी परळीतील डॉक्टरांवर आरोप केलेले आहेत त्याबदल आम्ही आमची बाजु नम्रपणे मांड इच्छीतो आज कोरोना संदर्भात सर्वत्र भितीचे वातावरण आहे.यामध्ये डॉक्टर्स व जनतेने घेतलेला आहे.सर्वप्रथम सॅनिटायझर बदल उल्लेख केला गेला आहे.आज सरकारने एवढी जनजागृती केले आहे की आम्हाला वाटत आहे या नियमांच पालन करीत आहेत आम्ही आमच्या दवाखान्यात सॅनीटाईझर ठेवलेले आहेत व ते प्रत्येकजणाला व स्वत तपासणी नंतर वापरत आहोत.सर्व दवााखाने सोडियम हायपोक्वालेरेटने दिवसातुन कमीत कमी ४ वेळेस साफ केले जातात.
दवाखान्यात येणारया प्रत्येक रूग्णास सोशल डिस्टंसिंग ठेवण्याबददल आमचे कर्मचारी सतत सांगत असतात.गर्दी करू नका असे वारंवार सांगण्यात येते.येणारा प्रत्येक व्यक्ती मास्क लावुन येत आहे की,नाही याची सुध्दा तपासणी केली जाते.ओ.पी.डी.च्या बाहेरच थर्मल गनने पेशंटचे टेम्प्रेचर घेतले जाते व त्याप्रमाणे उपाय योजना केली जाते.तरी आम्ही सर्व डॉक्टर्स सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
म्हणुन कोणीही गैरसमज करून घेऊ नये व डॉक्टरांनी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये व रूग्णांची दिशाभुल करून नये असे आवाहन मे.असोसिएशन से अध्यक्ष डॉ.लोहिया व सचिव डॉ.मुंडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *