परळीचे काल पाठवलेले सर्व 28 स्वॕब निगेटिव्ह…!!
परळी : परळीतील माधवबाग येथील एक कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी माधवबाग, शारदा नगर भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे यामुळे परळीकरांच्या मनात धाकधुक वाढली होती.काल आरोग्य विभागाच्या वतिने 28 संशयीत व्यक्तींचे स्वॕब घेण्यात आले होते. परळीकरांच पुर्ण लक्ष लागुन असलेल्या त्या 28 व्यक्तींच्या स्वॕबचा रिपोर्ट अखेर निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
कंटेन्मेट झोन मध्ये असलेल्या माधवबाग परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान आज एकाच संशयीत व्यक्तींचा स्वॅब घेण्यात आला आहे.