परराज्यातील व्यक्तींनी स्वजिल्हयात परतण्यासाठी नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करावी- राहूल रेखावार
बीड : लॉकडाऊनमुळे बीड जिल्हयामध्ये अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजूर, विद्यार्थी,
यात्रेकरु, व्यक्ती ज्यांना आपल्या स्वजिल्हयात ट्रेनव्दारे अथवा बसव्दारे परतण्याची इच्छा आहे त्यांनी खालील माहितीसह आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करावी असे आवाहन राहूल रेखावार, जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.
नोंदणी करताना पुढील माहिती द्यावी,
१. संपूर्ण नाव :-
२. मूळ गाव,तालुका,जिल्हा व राज्य :-
३. मोबाईल क्रमांक :-
४. आधार क्रमांक व आधार कार्डची झेरॉक्स :-
५. ट्रेनने जाण्याची इच्छा आहे का ?
६. बसने महाराष्ट्राच्या हद्यीपर्यंत जाण्याची इच्छा आहे का ?