जालना

परराज्यातील लोकांचा जाण्याचा प्रवास खर्च जालना जिल्हा काँग्रेस कमिटी करणार – जिल्हाध्यक्ष देशमुख

जालना (प्रतिनिधी) ः देशातील विविध राज्याचे नागरीक व मजुर आणि कामगार प्रप्रांतात कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्धभवलेल्या लॉकडाऊमुळे अडकुन पडले आहेत. त्यांच्या मुळ गावी (परराज्यात) जाण्यासाठी त्यांच्याजवळ अदलापैसा नाही अश्या परप्रांतीयांना काँग्रेसपक्षाने मदतीचा हात पुढे केला आहे. जालना जिल्ह्यातील अश्या लोकांचा जाण्याचा प्रवास खर्च जालना जिल्हा काँग्रेस कमिटी करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगीतले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी पक्षाचे नेते खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देशातील विविध राज्यातील मजूर, कामगार कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यात जावू शकत नाही त्यांची अत्यंत हलाकीची परिस्थिती बनली आहे. हजारो कामगार पायी निघाले आहेत. देशातील या लाखो लोकांची गंभीर व नाजूक परिस्थिती समोर आल्यामुळे काँग्रेसपक्षाने या लाखो लोकांना त्यांच्या राज्यात पोहचत करण्यासाठी त्यांचा प्रवास खर्च उचल्ला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसनेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे चर्चा करून जालना जिल्ह्यात अडकलेले प्रप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पोहचत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद यांच्यावर जवाबदारी सोपवली आहे. सबंधीतांनी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *