परतुरात डॉ.दीपक कंदोई यांचा उपक्रम
रोग प्रतिकार शक्तीवर्धक व प्रतिबंधक होमीपथीक ओषधींचे मोफत वाटप
परतुर (प्रतिनिधी)- येथील प्रसिध्द होमीपाथिक डॉक्टर दीपक कंदोई यांनी आपल्या उपक्रमातुन कोरोना युध्दाचा सामाना करण्यासाठी यापासुन होणारा प्रभाव काहीचा रोखण्यासाठी खारीचा वाटा म्हणुन शहरात महत्वाच्या ठिकाणी रोग प्रतिकार शक्तीवर्धक व रोग प्रतिबंधक होमीपाॅथीक ओषधीचे आज दिनांक 19 मे रोजी मोफत वाटप केले. यात कोरोना युध्दाशी लढणारे योध्दा यात आरोग्य विभागासह, पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारीसह तहसील विभागात व पत्रकार बांधवाना हे औषध वाटप केले आहे.याबाबत माहिती देतांना डॉ दीपक कंदोई यांनी म्हटले की महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्रधान सदरील औशधाची निर्मीती आम्ही होमीयो पॅथीक पध्दतीने केली असुन. या औषधामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढुन अनेक रोगांना साथीच्या आजाराला हे औषध प्रतिबंधक करण्यास मोठे उपयोगी पडते असे ते म्हणाले. यावेळी येथील परतुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीश हुंबे, उपविभागीय अधीकारी भाउसाहेब जाधव व पत्रकार संघाचा सदरील औषधी सुर्पर्ध करत त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी परीश्रम करणा-या सर्व कर्मचा-यांना हे औशद दयावे अशी विंनती केली.दरम्यान या औषधामुळे निष्चीतचं रोग प्रतिकारक शक्ती वाढते जे कोरोना सारख्या आजारावर मात करणारे असले तरी प्रशासनाने जे नियम दिले त्यांत मास्क लावने, विनाकारण घराबाहेर न पडने व सार्वजनीक ठिकाणी गर्दी न करणे , व हस्तोंदलण टाळणे यासह दिलेल्या सर्व नियामाचे पालन देखील करा असे आहवण डॉ कंदोई यांनी केले आहे.सदरील होमीपाथीक ओषधी मोफत वाटप होत असल्याने सर्वत्र डॉ कंदोई यांच्या उपक्रमाचे कौत्युक होतांना दिसते.