पद्मावती मिञ मंडळाच्यां वतीने पोलीस व स्वच्छता अधीकारी यांचा पुष्पवृष्टी करून केला सन्मान…!

परळी : देशभरात कोरोना वायरस ने हाहाकार माजवला असुन देशभरात चाळीस हजार संक्रमित झाले आहेत. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आपला जीव धोक्यात टाकून देशपातळीवर काम करत आहे. राज्यात बर्याच कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी बांधवाना कोरोना ची लागन झाली असून दोन पोलीसांनी आपला जीव गमावला आहे. पद्मावती मिञ मंडळ अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रगण्य असुन समाजाचे आपण काही देणे लागतो ह्या भावनेतून परळीत दिवस राञ काम करणारे पोलीस कर्मचारी व स्वच्छता अधीकारी कामगारासह प्रोत्साहन वाढवण्यासाठी पद्मावती गल्ली येथे पुष्पवृष्टी करून अगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला आहे या वेळी सतत अग्रेसर असणारे मा. नगरसेवक तथा भाजपा चे नेते किशोर केन्द्रें यांनी सर्व अधीकारी व कर्मचारी यांचे कार्याचे कौतुक करून तुमच्या सतर्कतेमुळे आपला जिल्हा ग्रीन झोन मध्ये येउन जिल्हाची सर्व जनता सुरक्षित होत आहे .असे उदगार करून सर्व आलेल्या पोलीस कर्मचारी व स्वच्छता अधीकारी याच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी पद्मावती मिञ मंडळ व नागरीकांना अवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *