पत्रकार आशिष सवाई यांनी कोरोनावर मिळवला विजयश्री
बीड : येथील पत्रकार आशिष सवाई यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर वैष्णव पॅलेसमधील कोव्हिड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. गेल्या आठ दिवसापासून ते कोरोनाशी लढा देऊन अखेर त्यांनी कोरोना विषाणूवर विजय प्राप्त केला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरातील व्यापारी तसेच पत्रकारांची अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम गत दहा दिवसांपूर्वी बीड शहरात राबवली होती. यावेळी पत्रकार सवाई यांनी स्वतः ची अँटीजेन टेस्ट केली होती. यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्यांचे आजोबा उत्तम सवाई यांची टेस्ट केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या आजोबांच्या।संपर्कात पत्रकार सवाई आल्याने परत त्यांनी स्वतः ची टेस्ट करून घेतली. यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने उपचारासाठी त्यांना वैष्णव पॅलेसमधील कोव्हिड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान चार दिवसांपूर्वीचं त्यांचे 75 वर्षीय आजोबा उत्तमराव सवाई यांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज आशिष यांनी ही कोरोनाला हरवत कोव्हिडं सेंटर मधून त्यांना आज सुट्टी दिली जाणार आहे. दरम्यान सेवानिवृत्ती पोलिस असलेले आजोबा आणि पत्रकार असलेला नातू या दोघांनी कोरोनावर विजयश्री मिळवल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.