पत्रकाराना पन्नास लाखाचे विमा कवच देण्यास राज्य सरकारची मान्यता…!

मुंबई : कोरोना महामारीच्या या गंभीर परीस्थितीत सामान्य जना़ंच्या विकास व सुरक्षेसाठी अहोरात्र सतर्कतेने कार्य करणार्या पत्रकार बांधवांसाठी कुठल्याही शासन सुविधा कुठलाही आर्थिक आधार सरकार कडुन निर्माण करण्यात आले नसल्याने तसेच चोविस तास सामाजिक सुरक्षेतेसाठी आपली तहान भुख विसरून या महामारीच्या संबधी जन जागृतीचे कार्य हे पत्रकार बांधव करीत आसल्याने ही त्यांची आत्यंत महत्वाची भुमिका आसुन पत्रकार बांधवांना पन्नास लाख रुपयांचा विमा लागु करण्यात यावा आशी मागणी श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने दि.30/4/2020 या दिवशी मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे निवेदनाव्दारे करण्यात आली होती.या मागणी निवेदनाची दख्खल राज्य सरकार ने घेतली आसुन कोरोनाच्या संबधी रिपोर्टींग करत असताना एखाद्या पत्रराराचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे या बाबद श्रमिक क्रांती आभियानाच्या वतीने मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचे आभार व्यक्त करण्यात आले आसुन या यशस्वीते बाबद पत्रकार भावंडांचे संघटनेच्या वतीने आभिनंदन ही करण्यात आले आहे,या बाबद पत्रकार बांधवात उत्साहाचे वातावरण आसुन सर्व सामान्यात संघटनेच्या यशस्वीतेबाबद कौतुक करण्यात येत आहे,या मागणीचा पाठपुरावा संघटनेचे आध्यक्ष मारुती जयवंतराव गुंडीले सह संघटनेचे कार्यकर्ते बालाजी आदावळे,गोविंद शिंदे,लक्ष्मण रणदिवे, विकास बलांडे,किरण जाधव, राजकुमार सुर्यवंशी, आर्चना तोगरे, रिहाना खादुभाई,इत्यादीनी केला आहे,या विम्याच्या संबधी संघटनेने पुरते समाधान व्यक्त केले आसले तरी ही याच मागणीच्या बरोबर पत्रकाराना दरमाह विस हजार रुपये मानधन देण्याची ही मागणी केली होती त्याचाही पाठपुरावा करणार आसल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *