Uncategorized

पत्नी च्या खुनाच्या आरोपातून कौठळी तांडा ता.परळी येथील आरोपी दिलीप चव्हाण याची निर्दोष मुक्तता

अंबाजोगाई:- येथील 2 रे जिल्हा व सत्र न्यायालयात सत्र के.क्र.89/2018 सरकार वि दिलीप चव्हाण या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपीची कलम ३०२,४९८-अ भा. दं.वि. या आरोपातून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे साहेब यांनी दि.२३/०९/२०२० रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.* *सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की प्रस्तुत प्रकरणातील आरोपी ने मयत पत्नी स तू तुझ्या वडिलांकडून नवी मोटार सायकल घेऊन ये असे म्हणून त्रास देऊ लागला,मयत सुनीता च्या वडिलांनी आरोपी दिलीप यास मयत सुनीता ला चांगले सांभाळावे या बाबत विनंती केली,नंतर मयत सुनीता हिस दोन मुली झाल्य व आरोपी हा ट्रॅक्टर ड्रायव्हर असून पत्नी व त्याच्या आई वडिलांन सोबत उसतोडीवर कामासाठी गेले होते,दि.०३/०७/२०१८ रोजी आठ ते आकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या राहत्या घरी पत्नी सुनीता हिला म्हणाला की तुझ्या वडिलांनी मोटार सायकल मला का घेऊन दिली नाही या कारणावरून मारहाण करुन हाताने गळा दाबून पत्नी सुनीता हिस जीवे मारलेले आहे,त्यानंतर मयत पत्नी ला उपचारकमी सरकारी दवाखाना परळी येथे नेले असता,सुनीता ही उपचारास दाखल करण्यापूर्वीच मरण पावलेली होती आशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येऊन प्रकरण सुनावणी साठी अंबाजोगाई न्यायालयात वर्ग करण्यात आले. *सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी हा बीड जिल्हा कारागृह येथे दोन वर्षे ,दोन महिने न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे लॉकडाऊन च्या दरम्यान प्रस्तुत प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता फिर्यादी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु फिर्यादी पक्ष आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करू न शकल्यामुळे वआरोपिच्या वकिलांचा बचाव गृहीत धरून आरोपीची कलम ३०२,४९८-अ भा. दं. वि.या आरोपातून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.डी. एन. सुरवसे साहेब यांनी दि.२३/०९/२०२० रोजी सबळ पुराव्याभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.* सदरील प्रकरणात आरोपी तर्फे अँड.अशोक कवडे यांनी काम पाहिले त्यांना मदत अँड.रणजीत सोळंके,अँड.डी. डी.गंगणे,अँड.एस. बी.करपे,अँड.आर.एस. सापते , अँड.आर.आर. जाधव व अँड.लखन गायकवाड यांनी सहकार्य केले. चौकट :प्रस्तुत प्रकरणातिल आरोपी हा मागील दोन वर्षांपासून जिल्हा कारागृह बीड येथे जेल मध्ये होता,लॉकडावून च्या कार्यकाळात अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेला खटलेचा निकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *