पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून बनसारोळा ता.केज येथील आरोपीची अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात जमीन मंजूर

परळी : सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की दि.११/०३/२०१९ रोजी फिर्यादी सुनील सोजर अंधारे पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे उसुफवडगाव ता.केज,जि. बीड रात्रगस्त चेकिंग ड्युटी करत असताना बीड येथील नियंत्रण कक्ष अधिकारी कवडे यांनि फोनद्वारे कळवले की मौजे बनसारोळा ता केज येथिल अँबुलन्स १०८ मधील डॉक्टरानी कळवले की बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरमळी यांच्या घरी जाऊन त्याची पत्नी काजल हिची तापसनी केली असता ती मयत झाली आहे,असे कळवले ,फिर्यादीने बनसारोळा येथे जाऊन सदर घटनेची पाहणी करून ,चौकशी केली व काजल हिचे प्रेत शवग्रहात ठेवले.त्यानंतर आरोपीला अंबाजोगाई येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ,आरोपी ज्ञानेश्वर गोरमाळी ने सांगितले की त्याची पत्नी काजल हिचे गावातील रविशंकर धायगुडे याच्याशी प्रेम संबंध आहेत, आरोपीने पत्नीस विचारले असता तिने प्रथम उडवाउडवी ची उत्तरे दिली व उगच माझ्यावर संशय घेऊ नका अशी म्हणाली,काही वेळा नंतर पुन्हा विचारपूस केली असता तिने काहीच सांगितले नाही,त्यामुळे अरोपी ज्ञानेश्वर गोरमाळी ने तिला चपटाने मारहाण चालू केली असता पत्नी ने सांगितले की माझे व रविशंकर चे प्रेमसंबंध आहेत व आमचे बऱ्याच वेळा शरीर सबंध आलेले आहेत,आरोपीला राग आल्याने घरातील कोपऱ्यात ठेवलेला खोरा घेतला व खोऱ्याच्या दांड्याने पत्नी काजल हिच्या पाठीत,डोक्यात,मांडीवर, पायावर,मारले.त्यानंतर आरोपीची पत्नी जमिनीवर बेशुद्ध पडली असता आरोपीने उठवण्याचा पर्यंत केला परंतु ती काही उठली नाही,त्यानंतर आरोपीने पत्नी उठत नसल्याने १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून अँबुलन्स ला बोलावले व आरोपी ज्ञानेश्वर गोरमाली हा फरार झाला,डॉक्टरांनी येऊन काजल हिस तपासले असता काजल ही मयत झाल्याचे सांगितले.अशा प्रकारे आरोपी ने चौकशी दरम्यान सांगितले,म्हणून आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन युसुफवडगाव ता,केज येथे कलम 302,भा.द.वि.प्रमाणे गुन्हा नोंद झाला व सदरील प्रकरणात तपासादरम्यान आरोपी ज्ञानेश्वर हा बीड कारागृहात १६ महिने पासून कोठडीत ठेवण्यात आला होता व त्याच्या विरुद्ध अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सत्र.केस.क्र१३५/२०१९ प्रमाणे दाखल करण्यात आले. आरोपीच्या वतीने अँड.अशोक कवडे यांनी आरोपीला जमीन मिळण्यासाठी जमीन चा अर्ज दाखल केला,सदर प्रकरणाची सुनावणी झाली असता ,आरोपीच्या वकिलानी केलेला युक्तिवाद व सर्वोच्य व उच्च न्यायालयाचे दाखले गृहीत धरून आरोपी ज्ञानेश्वर गोरमाळी याची कलम ३०२भा. द.वि या गुन्हयातून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.२ श्री.डी.एन. सुरवसे साहेब यांनी दि.३०/०६/२०२०रोजी आरोपीचा सशर्त जमीन मंजूर केला.
सदरील प्रकरणात आरोपीतर्फे अँड.ए. बी. कवडे यांनी काम पाहिले व त्यांना अँड.डी. डी.गंगणे,अँड.एस.बी.करपे.अँड.आर.एस.सापते व अँड.लखन गायकवाड यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *