FEATUREDLatestNewsबीड जिल्हामहाराष्ट्र

पंतप्रधान पिक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ -वसंत मुंडे

परळी (प्रतिनिधी )देशामध्ये सर्व स्तरावर शेतकरी आपल्या स्वतःच्या पिकाचा पिक विमा सेवा केंद्रावर जाऊन भरत आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणी आल्यामुळे केंद्र सरकारकडे पीक विमा भरण्याची मुदत वाढ राज्य सरकारने मागितली होती या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदतवाढ 5 ऑगस्ट पर्यंत पिक विमा भरण्यासाठी मिळाली याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे . तरीपण अनेक शेतकरी सातबारा ऑनलाइन न झाल्यामुळे व कोरणा लॉक डाऊन मुळे कागदपत्रे मिळत नसल्यामुळे सेवा केंद्रावर विमा भरताना अडचणी निर्माण झाल्यामुळे देशातील सर्वच राज्याने केंद्राकडे पिक विमा शेतकऱ्यांना भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती .त्यामुळे केंद्र सरकारने आज दिनांक 31 जुलै 2020 पंतप्रधान पिक विमा योजनेचे भारत देशाचे कृषी विभागाचे सहसचिव डॉ. आशिष कुमार भूतानि यांनी भारत सरकार कडून आदेश पारित केले आहेत.यामध्ये 5ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तरी शेतकरी बांधवांनी सेवा केंद्रावर जाऊन पिक विमा भरावा आसे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *