पंचवटी भोजनालयने शिवभोजन थाळीचा दिडशेचा टप्पा केला पार

परळी : परळीतील बस स्थानक समोर असलेल्या पंचवटीभोजनालय येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीला प्रचंड प्रतिसाद मिळत असुन पाच दिवसात येथील शिवभोजन थाळीने दिडशेचा टप्पा पार केला असुन अजुन थाळी वाढविण्याची मागणी गरजवंतातुन होत आहे.जगात कोरोना विषाणुने थैमान घातले असुन भारतात सर्वत्र लाँकडाऊन केले गेले आहे.या लाँकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होवु नये म्हणुन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार व युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोरगरिब,गरजु जनतेला पाच रूपयात जेवण मिळावे म्हणुन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मागणीनुसार शिवभोजन केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.त्याच धर्तीवरबीड जिल्हात शिवभोजन केंद्र सुरू करावेअसा पाठपुरावा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केल्यावर जिल्ह्यात शिवभोजनकेंद्र सुरू करण्यात आली असुन परळी शहरात तीन केंद्राना मान्यता मिळाली असुन त्यात बस स्थानक समोरील शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश विभुते यांच्या पंचवटी भोजनालयचा समावेश आहे.या केंद्रात जेवण्यास येणाऱ्या ग्रामिण व शहरातील गरजवंता साठी हँण्डवाँश,सेनिटरायझर,तोंडाला माक्स लावणे बंधन कारक करण्यात आले असुन शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जात आहे तसेच केंद्रातील कर्मचारीवर्गासाठी किचन किटचा वापर केला जात आहे.या शिवभोजन केंद्राला न.प.व तहसिलचे अधिकारी वेळोवेळी भेट देवुन आढावा घेत आहे.सदर शिवभोजन केंद्रावर शिनसेनेचे,बीडजिल्हा सपंर्क प्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, बाळासाहेब अंबुरे हे जातीने लक्ष ठेवुन असुन शिवसेनेचे परळी तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे हे भेट देवुन पाहणी करीत आहे.या शिवभोजन केंद्राला 100थाळीची परवानगी असुन आज घडीला शिवभोजन थाळीसाठी अधिकची गर्दी वाढत असल्याने पन्नासच्यावर शिवभोजन थाळी दिली जात असुन   दिडशे थाळीचा टप्पा या केंद्राने पार केला असुन अजुन थाळी वाढविण्याची मागणी गोरगरिब जनतेतुन होत असल्याची माहिती शिवभोजन केंद्र चालक शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश विभुते यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *