पंकजा मुंडे सोबत एकनिष्ठतेचे शिवाजी शिंदे यांनी दिले प्रमाण ; भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा
परळी : भारतीय जनता पक्षाने पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान आपण भाजपाला सोडचिठ्ठी दिली असली तरी पंकजाताई मुंडे यांच्यासोबत कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंकजाताई मुंडे यांनी भाजपासाठी मोठे योगदान दिले आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत त्यांना उमेदवारी दिली जाईल असे सर्वांना वाटत होते. त्यांचे नाव सुरूवातीपासून उमेदवारीच्या यादीत आघाडीवर होते. मात्र पक्षाने उमेदवारी देताना पंकजाताई मुंडे यांना डावलून दुसरेच उमेदवार दिले आहेत. हा निष्ठावंतांवर अन्याय असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात असुन निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक कार्यकर्ते उद्विग्न झाले आहेत.
भाजीपाला निष्ठावंतांची गरज राहिलेली नाही अशी संतप्त भावना व्यक्त करीत आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले. दरम्यान आपण पक्षाचा राजीनामा दिला असला तरी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कायम पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.