पंकजाताई मुंडे यांची भाजपा राष्ट्रीय सचिवपदी निवडीचे भाजपायुमो तर्फे परळीत जल्लोश

(प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिवपदी माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची निवड झाली. हे वृत्त कळताच परळीत भारतीय जनता युवा मोर्चा बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपायुमोतर्फे जल्लोश साजरा करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मध्ये पंकजाताई मुंडे यांचा समावेश झाला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समावेशाने आता राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे नेतृत्व अधिक झळाळून निघणार आहे. भारतीय जनता पार्टीची नविन कार्यकारीणीची निवड करण्यात आली असुन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पंकजाताई मुंडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड केली आहे.या निवडीचे भारतीय जनता युवा मोर्चा बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ भाऊ चाटे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मी टॉवर चौक, संभाजी चौक इटके कॉर्नर या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. पंकजाताई मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील एक धडाडीच्या व आक्रमक नेत्या म्हणून पाहिले जाते. उत्कृष्ट वक्त्या, संघटन कौशल्य व काम करण्याची हातोटी या गुणांमुळे समाजातील सर्व जाती धर्मात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दोन वेळा आमदार राहिलेल्या पंकजाताई मुंडे यांनी भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचित पिडित घटकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत तसेच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून गोरगरिबांचे संसार उभा केले. यासर्व कार्याची दखल घेत आता पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिल्याने इथेही त्यांच्या नेतृत्वाची चूणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. या निवडीबद्द्ल परळीत भाजपायुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी आनंदोस्तव साजरा केला. यावेळी भीमराव दादा मुंडे,रवि कांदे सर,राजेश गित्ते,संतोष सोळंके,उमेश खाडे, सुरेश माने,बाळू फड,अजय गित्ते सर,गणेश होळंबे,अरुण पाठक, योगेश पांडकर,वेदांत सारडा,अंकुश मुंडे,सुरेश सातभाई,दीपक नागरगोजे,राजेंद्र ओझा, सुशील हरंगुळे,नितीन मुंडे,राहुल मिसाळ,अजय गोरेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीचे भाजयुमोचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले असुन परळीसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *