जालना

नौकरीच्या मागे न लागता तरुणांनी शेती व्यवसायाकडे लक्ष देवून उदयोग व्यवसाय करावा – ना. दानवे

                       जालना (प्रतिनिधी) – शासकीय नौकरी च्या मागे न लागता तरुणांनी शिक्षण पुर्ण झाल्यावर शेती व्यवसायसह शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यावसाकडे लक्ष देण्याची काळाची गरज असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी बदनापूर ‍विधानसभा मतदार संघातील टाकळी कोलते येथे शेतकऱ्यांशी निवांत बसून लोकडाऊन मध्ये अधुनिक शेतीच्या प्रश्नावर चर्चा केली.

          केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे व बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आ.नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघातील टाकळी कोलते व परीसरातील गावामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जावून शेतामध्ये सोशल डीस्टींगचे  अंतर राखवून संवाद साधला, यावेळी प्रत्यक्ष टाकळी कोलते येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जावून शेतकऱ्यांशी चर्चा केली तरुणांनी शिक्षण पुर्ण झाल्यावर शासकीय नौकरीच्या मागे लागून आपला वेळ घालवण्यापेक्षा शेती व्यवसायाकडे लक्ष देउन शेती बरोबरच दुग्ध व्यवसायसह अन्य जोडधंदा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून करण्याचे आवाहन केले.

          यावेळी बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आ.नारायण कुचे, पं.स. सभापती सौ. सविताताई रघुनाथ फुके, भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते, माजी प.स.सदस्य दामु आन्ना कोलते, संरपच विजय आहेर, चेअरमण दिलीपराव कोलते, उत्तमराव फुके,सरपंच सुनिल कोलते,  माधवराव कोलते, सुभाष कोलते, कैलास काकडे, हरीचंद्र कोलते, नवाबशेठ सय्यद, रामेश्वर कोलते, पुडलीक कोलते, आदीनाथ काकडे, शिवाजी खरात, शरद कोलते आदीसह शेतकरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *