निकिता जगतकर च्या आत्महत्येने परळीत खळबळ ; पोलीस तपास यंत्रणेकडे लक्ष !
परळी : परळी येथील एका खासगी नर्सिंग विद्यालयाची विद्यार्थिनी कु. निकिता सखाराम जगतकर वय (24) येथे 12 जून 2020 या दिवसी आपल्या दुपारच्या वेळी राहत्या घरी आत्महत्या केली होती. सदरील आत्महत्या हा चर्चेचा विषय परळी शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होता. परंतु निकिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी दुःखातून सावरून दिनांक 24 जून रोजी न पोलिसांमध्ये जाऊन रीतसर तक्रार देऊन निकिताच्या मारेकऱ्यांना ,आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या मूलास शिक्षा व्हावी यासाठी तक्रार दाखल केली,
ज्या दिवशी निकिताने आत्महत्या केली. त्या दिवशी त्याच्या घरातील चुलत भावाचे लग्न हे सोनपेठ येथे होते. आई-वडीलांनी निकिताला लग्नाला सोबत चल म्हणून बोलले पण निकिताने लग्नात जाण्यास नकार दिला त्यामुळे त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते असं दिसून येते, सकाळी आई-वडील लग्न साठी गावाला गेल्या नंतर दुपारच्या वेळेस घरी ज्यावेळेस परत आले व पाहिले त्यावेळेस निकिता घरातील पत्राच्या आडूला लटकलेल्या स्थितीमध्ये मृतावस्थेत दिसून आली.
घरातील सर्वात छोटी लाडाची मुलगी म्हणून निकिता ओळखली जात होती. उस्मान लतीफ शेख रा. मुल्ला गल्ली, इस्लामपूरला बंगला ,परळी. मुलावर प्रेम करत होती. तो मुलगा पण लग्नाच्या अणाभका खात होता.परंतु त्या मुलाने लग्नास नकार देऊन तुला व तुझ्या आई वडीलांना मारुन टाकीन अशी धमकी सतत देत असल्याने त्रासाला कंटाळून शेवटी आत्महत्या केली. निकिताच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली, तिचा बोलका स्वभाव या सर्व गोष्टी व शिक्षणाची जिद्द वाखाणण्याजोगी होती. परंतु तिच्या आयुष्यात असे काही तरी घडले की तिने आपली स्वतःची जीवन यात्रा घरात कोणी नसताना संपवली
संभाजीनगर पोलीस ठाण्या परळी च्या वतीने संबंधित प्रकरणाची तपासणी करण्यात येत आहे. परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या प्रवृत्त करून जीवे मारण्याच्या धमकी दिल्याबाबत उस्मान शेख यांच्यावर भादावी प्रमाणे 306 / 506 , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत 3(2) va गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास आंबेजोगाई चे डी वाय एस पी राहुल धस हे करीत आहेत.