ना.धनंजय मुंडे यांना उत्तम आरोग्य लाभो ; वैद्यनाथ प्रभुंना अभयकुमार ठक्कर यांची प्रार्थना..!!
परळी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे कोरोना विषाणूची बाधा झाल्याने मुंबईत उपचार घेत असून त्यांना उत्तम आरोग्य मिळो व पुन्हा ते जनसेवेत त्याच जोमाने रूजू होवोत अशी प्रार्थना बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ प्रभूंना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या अगदी पहिल्या दिवसापासून मुंबईत जाऊपर्यंत ना.धनंजय मुंडे हे परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होवू नये या दृष्टीकोनातून कार्यकर्ता ते नागरिक अशी रचना करून सामान्यांचे प्रश्न सोडवितांनाच नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी कशी काळजी घ्यावी इथपर्यंत ना.धनंजय मुंडे हे लक्ष ठेवून होते. सुरक्षेचे सर्व उपाय अंमलात असतांनाही त्यांना झालेली कोरोनाची लागण हा निश्चितच चिंतेचा विषय असून प्रभू वैद्यनाथ त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करो अशी प्रार्थना अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी व्यक्त केली आहे. अनेक संकटांना मोठ्या हिंमतीने तोंड देणारे धनंजय मुंडे कोरोनाला सुद्धा पराभूत करतील असा विश्वास ठक्कर यांनी व्यक्त केला आहे.