ना. धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार त्या 14 कामगारांना पाठविले मायदेशी – महादेव रोडे

परळी : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संपुर्ण लाॅकडाऊन घोषित करण्यात आहे त्यामुळे बाहेर राज्यातील अनेक नागरिक ईतरञ अडकून पडले असुन परळी येथे देखील 14 कामगार महाशिवरात्रीला याञेत व्यवसायासाठी आलेल्या कामगार लाॅकडाऊन मुळे अडकले होते.ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेत तथा नगरसेवक महादेव रोडे यांच्या प्रयत्नामुळे परळी शहरात महाशिवरात्रीच्या निमीत्ताने रहाट पाळण्याचा व्यवसाय करण्यासाठी मध्यप्रदेश येथील शिवणी गावचे 14 कामगारांना त्यांच्या मायदेशी पाठविले. मागील बर्याच दिवसापासून त्या कामगारांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. कामगारांची माहिती मिळताच महादेव रोडे यांनी त्यांच्या दोन टाईम जेवणाची व्यवस्था परळीतील कार्यरत असलेल्या अन्नपूर्णा चारीटेबल ट्रस्ट ला विनंती करून त्याचा जेवणाची व्यवस्था केली होती व दैनंदिन त्या कामगारांना भेटून अडचणी ची विचारपूस करून ते मदत करत होते त्यातीलच एक भाग म्हणून प्रशासनाने लाॅकडाऊन च्या काही अटी शिथिल केल्यानंतर लगेच ना. धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार त्या कामगारांना मध्यप्रदेशातील आपल्या गावी पाठवले. चौदा कामगारांनी आपल्या गावी परत वापस पाठविले बद्दल ना. धनंजय मुंडे साहेबांचे व नगरसेवक महादेव रोडे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *