FEATUREDLatestNewsबीड जिल्हामहाराष्ट्र

ना. धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघाला मोठी भेट. परळी बायपासच्या ६० कोटी रुपयांच्या कामाची निविदाही प्रसिद्ध

परळी (दि. ११) —- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील जनतेला मोठी भेट दिली असून, त्यांच्या प्रयत्नातून परळी शहराचा बायपास, परळी ते गंगाखेड रस्ता व परळी ते धर्मापुरी रस्ता या तीनही कामांना मंजुरी मिळाली आहे. परळी शहराच्या बायपासला मागील पालकमंत्र्यांच्या कार्यकाळात अनेकवेळा उदघाटने होऊनही मंजुरी किंवा निधी उपलब्ध होऊ शकला नव्हता. तसेच परळी ते गंगाखेड व परळी ते धर्मापुरी रस्ता अगदीच खराब झाल्याने त्यावरून जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हे तीनही महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यापासून त्यांनी तातडीने या तीनही रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला, या रस्त्यांना त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे परळी शहर बायपास राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८८ याचे ४ किमी लांबीचे चारपदरी बांधकाम करण्यासाठी ६०.२३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्याची निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर परळी ते गंगाखेड हा अत्यंत रहदारीचा व महत्वपूर्ण मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ हा ३०.४० किमी लांबीचा रस्ता पेव्हर शोल्डर पद्धतीने दोन पदरी बांधकाम करण्यासाठी २२० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच परळी ते धर्मापुरी या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ चा भाग असलेल्या २२.५० किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, सशक्तीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या २०२० – २१ च्या वार्षिक रस्ते विकास आराखड्यात या तीनही रस्त्याचा समावेश करण्यात आला असून, याबद्दलचे अधिकृत पत्र राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागास प्राप्त झाले आहे. मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या 3 रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत. चौकट आश्वासनपूर्ती चा आनंद दरम्यान परळीकरांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या या तीन रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले असून परळीच्या जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याबद्दल आनंद होत असल्याचे म्हटले आहे. परळी अंबाजोगाई या धनंजय मुंडे यांच्यात प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या रस्त्याचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. चौफेर विकासाची दृष्टी एकीकडे करोनाच्या संकटात बीड जिल्ह्याला आरोग्यविषयक बाबींच्या दृष्टीने सक्षम करणे, गरीब आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे या अत्यावश्यक गोष्टी सोबतच मतदार संघाच्या दृष्टीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी धनंजय मुंडे झपाट्याने काम करीत असून परळी अंबाजोगाई रस्त्या पाठोपाठ या तीन रस्त्यांना मिळालेली मान्यता, एमआयडीसी उभारणीच्या दृष्टिकोनातून नुकतीच अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी यातून त्यांची विकासाची दृष्टी पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *