ना. टोपे यांच्या पाठपुराव्याने उजव्या कालव्यातून गोदावरी पात्रात पाणी

अंबड (प्रतिनिधी)- अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमधील नागरिकांनी जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गोदापात्रात पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. पालकमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांची व शेतकऱ्यांची दखल घेऊन गोदावरी पाटबंधारे महामंडळ,कार्यकारी संचालक व कडाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून गोदावरी पात्रात उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने बळेगाव, आपेगाव, साष्ट पिंपळगाव, गोरी गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण व पाथरवाला बु.आदी गावांना पाण्याचा फायदा होणार आहे तसेच दोन दिवसांनी जोगलादेवी, मंगरूळ व राजाटाकळी उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे  नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच राजाटाकळी बंधाऱ्यातून भादली, शिरसवाडी व गुंज या गावांना पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी व  शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *