नाळवंडी रोड येथील स्थलांतरित रुग्णालयाची ओपीडी बीड शहरात स्थलांतरित करण्यात यावी ; शेख सलमान
बीड : मागील काही महिन्यापासून बीड जिल्हा रुग्णालय सर्वसामान्य OPD नाळवंडी रोड बीड येथे स्थलांतरित करण्यात आलेली आहे.जिल्हा रुग्णालयात कोरोना वार्ड स्थापन करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता पण स्थलांतरित करण्यात आलेली जागा खूपच दूर आणि असुरक्षित असल्यामुळे बीड शहर वसियांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नाळवंडी रोड येथील OPD वयस्क रुग्णांसाठी खूपच दूर आणि असुविधाजनक असल्याने रूग्णांचे हाल होत आहे. इमर्जन्सी रुग्णांसाठी लवकरात लवकर उपचार भेटणे खूपच गरजेचे असून नवीन ओपीडी अशा रुग्णांना सुविधाजनक आहे. नवीन OPD ची जागा दूर तर आहेच पण रात्री बेरात्री साठी सुरक्षित ही नाही या भागात चोर लुटारू आणि गुन्हेगारीचे प्रमाण खूपच जास्त आहे अशा काही कारणांमुळे बीड शहर वासीयांकडून आरोग्य विभागास विनंती करण्यात येत आहे की त्यांनी नाळवंडी रोड येथील जिल्हा रुग्णालय बीड शहरात कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी .
महाराष्ट्रमुस्लिममहासंघ विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांची मागणी