नागरिकांनी ई- संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर
परभणी : भारत सरकारकडून ई-संजीवनी ऑनलाईन ओ.पी.डी. सेवेस प्रांरभ झालेला आहे असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ई – संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा घरात राहुन लाभ घ्यावा व घराबाहेर पडणे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुंटुब कल्याण मंत्रालयामार्फत ई – संजीवनी ऑनलाईन ओ . पी . डी . सेवेस प्रांरभ झालेला आहे. esanjeevaniopd.in या पोर्टलवर नागरिकांना आरोग्य विषयक सल्ला घेता येईल जेणेकरुन रुग्णांना घराबाहेर पडावे लागणार नाही किंवा रुग्णालयात न येता सोशल डिस्टन्स पाळता येईल. नागरिकांनी या संकेत स्थळावर स्वतःच्या मोबाईल क्रमांकाद्वारे रजिस्ट्रेशन करावयाचे असून त्यानंतर डॉक्टरांशी संवाद साधता येईल. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ला व औषधोपचार ई . प्रिस्क्रिप्शनद्वारे डाऊनलोड करता येईल. ई – संजीवनी ऑनलाईन ओ . पी . डी . ची वेळ सकाळी ९ : ३० ते दुपारी १ :३० अशी ठेवण्यात आलेली आहे. सदरील सेवा ही आठवडयातुन सोमवार ते शनिवार अशी असुन रविवारी ही सेवा बंद राहील. सदरील वैद्यकीय सेवा व सल्ला हा मोफत देण्यात येणार आहे. कोरोना विषाणु संदर्भात बुधवार दि. २९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ७१६ व आज रोजी दाखल झालेले १६ असे एकुण ७३२ संशयितांची नोंद झाली असून जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे