नांदेड:-ACQUACARE,सीलबंद बाटलीत किडे,मकड्या,आढळल्याने खळबळ… बाटलीबंद पाण्यात किडे आल्यामुळे ACQUACARE, मिनिरल वॉटर कंपनी चे बेजबाबदार काम होत असल्याचे धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात उघडकीस आला आहे.
नांदेड : घराबाहेर जाताना आपण विकत घेतलेलं पाणी शुद्ध असतं, असा ठाम विश्वास आपल्याला असतो. मात्र बाटलीबंद पाणी पिण्यायोग्य असतं का, असा सवाल उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे घडला आहे. ACQUACARE, कंपनी चे सीलबंद पाण्यात चक्क किडे, मकड्या, आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ACQUACARE नावाच्या किडे व मकड्या असलेल्या दूषित पाण्याने भरलेल्या या बाटल्या सीलबंद आहेत. व जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक दुकानांमध्ये ही सीलबंद पाण्याची बॉटल आहे त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा भीतीदायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकांनी पैसे देऊन खरेदी केलेल्या सीलबंद बाटलीची शहनिशा करूनच खरेदी करावी अशा ACQUACARE सीलबंद बाटली आपण खरेदी करू नये बाजारामध्ये अनेक प्रकारचे सीलबंद बाटल्या भेटतात आपण जेव्हा हे खरेदी करतो तेव्हा चौकशी करून कंपनीचे नाव बघूनच खरेदी करावी आपल्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार कँपनीच्या बाटल्या आपण खरेदी करू नये. ACQUACARE या नावाने हे बाटलीबंद पाणी विकली जातं आहे. नांदेड जिल्ह्याच्या midc मध्ये या पाण्याचं उत्पादन केलं जात असल्याचा उल्लेख बाटलीवर आहे. बेजबाबदार रित्या सुरु असलेले पिण्याच्या पाण्याचे उद्योग ही मोठी समस्या आहे. बाटलीबंद पाण्याच्या कंपन्या भूछत्रासारख्या गावोगावी उभ्या राहिल्या आहेत. या स्थानिक कंपन्यांकडून स्वच्छेतेचे सगळे निकष पाण्यात बुडवले जातात. तेही अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून.