नांदेड गुड न्युजला रात्री ब्रेक ; कोरोनाचे दोन रुग्ण..!!

शेख इस्माईल नांदेड : कोरोना संदर्भात एक, दोन रुग्ण नांदेड मध्ये दररोज आढळून येत आसताना रविवार (ता.७) रोजी संध्याकाळ पर्यंत एकही रुग्ण सापडलेला नव्हता यामुळे नांदेडकरांसाठी गुड न्युज ठरली होती मात्र रात्रीच्या सुमारास आलेल्या अवहालातून दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
या दोन कोरोना रुग्णांमध्ये उमरकॉलनी येथील एक पुरुष (वय५४) आणि गुलजारबागेतील एका महिलेचा (वय५५) समावेश आहे. यानंतर कोरोना बाधितांचा जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १९२ वर पोहचली आहे. तर उपचाराअंती १३१ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *