नवी मुंबई विमानतळाला स्व.वसंतरावजी नाईक यांचे नाव द्या- वैजनाथ जाधव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-दि १२ हरीत क्रांतीचे प्रेरणेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कृषी अद्योगिक क्रांतीचे जनक , नवी मुंबईचे शिल्पकार आणि विकासाचे महानायक वसंतराव नाईक यांचे नाव नवी मुंबई येथील विमानतळाला स्व.वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी बंजारा मजदूर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैजनाथ जाधव यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे. राज्याचे ११ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनिय काम केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. १ जुलै १९१३ रोजी झाला जन्म स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्वाचे मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत वसंतराव नाईक यांच्या नावाचा प्राधान्याने उल्लेख केला जातो. या महनिय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खर्यान अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. आज महाराष्ट्र जो काही घडला आहे. त्यामध्ये सदरील मुख्यमंत्र्यांचे योगदान महत्वाचे आहे. वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म पुसद तालुक्यातील महुली या गावी १ जुलै १९१३ रोजी झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण, पोहरादेवी, उमरी, भोजली, बन्सी आदी गावात झाले. त्यांनी पुढे १९३८ साली नागपुरच्या मॉरिस महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी संपादीत केली तर १९४० साली एल.एल.बी. ही पदवी मिळविली. वसंतराव नाइक यांनी कृषि विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरीत वाणांचा अभ्यास करून तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पिक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यामुळे पुढे प्रत्येक जिल्ह्यात कापूस जिनिंग, सुतगिरणी, प्रेसिंग, तेलघाणी आदी सहकारी उद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे राहिले. त्यांनी आपल्या १९५२ ते १९७९ या सत्ताविस वर्षाच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या. दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल हे धाडसी उद्गार त्यांनी १९७१ साली पुर्णत्वास आणले.वयाच्या ६६ व्या वर्षी झाला मृत्यू त्यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी करून रोजगार हमी योजना देशभरात राबविली. त्यांच्या कृषी विषयक कार्याची दखल घेऊन दरवर्षी १ जुलै या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्यात कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्वाचे मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत वसंतराव नाईक यांच्या नावाचा प्राधान्याने उल्लेख केला जातो. या महनिय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खर्यान अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. आज महाराष्ट्र जो काही घडला आहे. त्यामध्ये सदरील मुख्यमंत्र्यांचे योगदान महत्वाचे आहे. तरी स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाने भरीव योजना आणाव्यात तसेच नवी मुंबईचे शिल्पकार स्व.वसंतराव नाईक यांचे नवी मुंबई येथील विमानतळाला नाव देऊन त्यांचा गौरव करावा तसेच त्यांचे विमानतळाला नाव द्यावी अशी मागणी बंजारा मजदूर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वैजनाथ प्रभाकर जाधव यांनी केले आहे. यानिवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती वैजनाथ जाधव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *