नळगीर गावच्या ग्रामविकास आधिकार्याची बदली थांबवा — श्रमिक क्रांतीची मागणी नळगीर

गावचे ग्रामविकास आधिकारी प्रकाश पवार यांची करण्यात आलेली बदली रद्द करावी ,आशी मागणी श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र या बिगर राजकिय संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे, याबाबदचे निवेदन संघटनेने दि.24/8/2020 या दिवशी मा. उपजिल्हाधिकारी उदगीर यांचेकडे दिले आहे, नळगीर गावचे ग्राम विकास आधिकारी मा.प्रकाश पवार यांची बदली करणेचा घाट काही स्वार्थी लोक घालत आसल्याने त्यांच्या बदलीचा आदेश निघाल्याची विश्वासनिय माहीती मिळाली आसल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आसुन ही बदली होणे हे नळगीर येथील ग्रामस्थां वर आन्याय केल्या सारखे होणार आहे,आसल्याची भावना ही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे,कोरोना महामारीच्या संकटात ग्राम विकास आधिकारी पवार यानी रात्र दिवस नळगीर च्या गावकर्यांंच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले आसुन त्याशिवाय शेतकरी शेतमजुरा़ंच्या कल्याणासाठी त्यानी तत्परतेने सतत कार्य केले आहेत आशी ग्वाही संघटनेच्या वतीने निवेदनानिवेदना व्दारे देण्यात आली आहे त्याची बदली होऊ नये या भुमिकेत मा.सरपंच संगम शेटकार सह मुख्य पत्रकार विनोद उगिले व सर्व निस्वार्थी ग्रामस्थ, आसुन बोटावर मोजण्या इसकेच स्वार्थी लोक एक चांगला आधिकारी काढून लावण्याच्या बेतात आहेत,आसा आरोपही संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे, बेकायदेशीर वागणार्या आधिकार्याच्या आम्ही कायदेशीर विरोधात असतो मात्र चांगल्या आधिकार्याची आम्ही पाठराखण ही करतो प्रकाश पवार हे चा़गले आधिकारी आहेत आसे ही त्यानी निवेदनाद्वारे कळविले आहे,जन सामान्याच्या भावना विचारात घेऊन झालेली बदली तत्काळ रद्द करुन आम्हाला दिलासा द्यावा आशी विनंती ही संघटनेच्या वतीने करण्यात आली आसुन चांगला आधिकारी गमवावे लागत आसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरुन सनदशीर मार्गाने भावना प्रकट करावे लागेल आसा इशारा ही संघटनेच्या वतीने निवेदनव्दारे देण्यात आला आहे, या निवेदनावर श्रमिक क्रांतीचे प्रमुख मारुती गुंडीले सह संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते लक्ष्मण रणदिवे, राजकुमार सुर्यवंशी,बालाजी आदावळे,ऋुषीकेश कांबळे,इत्यादीच्या स्वक्षर्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *