नगर परिषदांच्या सर्व सर्वसाधारण व विशेष सभेच्या कामकाजाचे छायाचित्रीकरण करावे ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार !!

बीड : नगर परिषद व नगरपंचायतींच्या सर्व सर्वसाधारण सभा व विशेष सभेच्या कामकाजाचे छायाचित्रीकरण ( व्हीडीओ रेकॉडींग ) करण्यात येऊन ते सुरक्षितपणे जतन करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

शासनाने यापूर्वी नगर परिषद व नगरपंचायतीच्या सर्वसाधारणसभा व विशेष सभांचे इतिवृत्त नगरपरिषद, नगरपंचायतींच्या संकेतस्थळावर सात दिवसात प्रदर्शित करणे बंधनकारक केले असून नगर परिषदा व नगरपंचायती यांचेकडुन अशी कार्यवाही केली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने सदर आदेश दिले आहेत.

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सर्वसाधारणसभा व विशेष सभांचे कामकाजाचे व्हीडीओ रेकॉडींग (छायाचित्रीकरण) करणे व ते सुरक्षितरित्या जतन करण्याची तसेच सर्वसाधारण सभा व विशेष सभांचे इतिवृत्त संदर्भीय शासन परिपत्रकानुसार नगरपरिषद, नगरपंचायतींच्या व संचालनालयाच्या संकेतस्थळावर सात दिवसात प्रदर्शित करण्याची जबाबदारी नगरपरिषद व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावर आहे.

जिल्हयातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभा व विशेष सभांमधील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासन व शासनाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.या बाबतीत शासन निर्देशानूसार काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *