नंदापूर येथे क्षयरुग्ण कुष्ठरुग्ण शोध अभियानास प्रारंभ
जालना (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाच्या वतीने जालना जिल्ह्यात 1 ते 14 डिसेंबर दरम्यान क्षयरोगासह कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येत असून आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे. त्याच पार्श्वभुमीवर पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जालना तालुक्यातील नंदापूर येथे ता. 1 डिसेंबरपासून सक्रिय क्षयरुग्ण कुष्ठरुग्ण शोध अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत गावातील, शेत वस्त्यावर राहायला गेलेल्या नागरीकांच्या घरोघरी जावून ज्या व्यक्तींना दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी खोकला, ताप किंवा भूक मंदावणे, वजन कमी होणे यासारखी लक्षणे आहेत, अशा संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शरीरावर खाज न येणारा लालसर बधीर चट्टा अशी कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्या आढळून आल्यास याबाबत रुग्णांची माहीती आजार बळावण्यापूर्वी आरोग्य विभागामार्फत त्याची मोफत तपासणी करून त्यांच्या वर औषध उपचार करण्यात येणार आहे. सदरील मोहिम 14 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार असून एकही व्यक्ती तपासणीपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या मोहीमेत पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, टी. बी. निरिक्षक देवकुमार जावळे, के. के. बोर्डे, आरोग्य सेविका पी. जी. भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका सुरेखा एन. आचलखांब, अलका खरात, स्वंयसेवक संजय एम. काळे, दशरथ जे. वाकोडे आदीं परिश्रम घेत आहे.
