धामनगांव प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा- दीपक डोके

जालना : बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे लॉकडाउन चा फायदा घेऊन जमीनीवर अतिक्रमण करुन बौद्ध तरुणांना गावातील गावगुंडांनी  बेदम मारहाण केली, ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, धामणगाव शिवारात शासनाने मागासवर्गीयांना महारहडुळ 12 एकर जमीन पोट भरण्यासाठी दिलेली आहे. त्यावर गावातल्या  जातीयवादि गावगुंडांनी अतिक्रमण  केले आहे. जमीन कसत असलेले  तरुण जाब विचारायला गेले असता त्यांना बेदम मारहाण  करून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला आहे. सदरिल प्रकरणी पिडीतांनी तक्रार देऊन 10 दिवस झाले तरी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, तरी पोलिस प्रशासनाने  तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा पदाधिकारी दीपक डोके, अशोक खरात,अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, विनोद दांडगे,अँड.कैलास रत्नपारखे,प्रकाश मगरे, संतोष शेळके, रविराज वाहुळ, सुरेंद्र तुपे,न्यानेश्वर बोबडे, राहुल तुपे,हरिष बोर्डे, सचिन पट्टेकर यांनी केले आहे.

35 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *