धन्यवाद..! ना.धनंजय मुंडे साहेब; पुणे मुंबईत अडकलेल्यांचे उदगार
परळी : आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे पुणे मुंबई कामासाठी येतो, पण आम्ही इकडे लांब पुणे मुंबई असतानाही आपला या कोरोनाच्या कठीण प्रसंगातही आपली मदत थेट आमच्याकडे एका फोनवर पोहचत आहे, आज आम्ही स्वतःला नशिबवान समजतो की आम्ही आपल्या मतदार संघातील मतदार आहोत अश्या शब्दात सारडगावचे मुळ रहिवासी असलेले आणी सध्या पुणे मुंबईत वास्तव्यात असलेल्या नागरिकांनी ना.धनंजय मुंडे साहेबांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.परळी तालुक्यातील मौजे सारडगावचे नागरिक आपल्या उधरनिर्वासाठी पुणे मुंबई येथे वास्तव्यात आहेत.कोरोनाच्या संघटात पुणे मुंबई हे शहरे अतिसंवेदनशील बनत चालले आहेत. तेथील कंपन्या लॉकडाउन मुळे पुर्णता बंद झाल्याने या कामगारावर उपासमारी ओडावली आहे शिवाय घरा बाहेर पडणे बंद आहे. अश्यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंञी ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या या अडकलेल्या नागरिकांना मदतीचा हात देत दिला आहे. आपण केलेल्या मदतीबद्दल काय बोलावे आणि काय नाही या संभ्रमात असताना एक विचार आला की असा ही एक लोकनेता आहे, की जो दूर असलेल्या आपल्या माणसांना मदतीचा हात देत आहेत. खरच धनुभाऊ आपल्या या कार्यासाठी आमच्या समस्त सारडगाव येथिल नागरिकां कडून धन्यवाद देऊन ईश्वर अश्या लोकनेत्याला उदंड दिर्घआयुष लाभावे अशी प्रार्थना करत आहेत असे संजय आघाव फुलचंद आघाव मुबई पुणे मित्र मंडळ प्रमुख अनंत गीते, अजय,संजय आघाव, तुकाराम दराडे, वाल्मिक गोलेर, बाबा घनगाव अदीनी ना.मुंडे प्रति भावना व्यक्त केल्या आहेत.