धनुभाऊ” ज्याला ज्याला तारी त्याला “कोरोना” कसा मारी…! डाॅक्टर व पोलीसांना 400 फेस शिल्डचे लवकरच वाटप

परळी : सध्या जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटाता विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणाऱ्या डॉक्टर व पोलिस समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे वतीने व धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून परळीतील डॉक्टर व पोलिस यांना 400 फेसशिल्ड वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी अध्यक्ष परळी मेडिकल असोसिएशनचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले.

जगभरासह देशात व राज्यात एकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटात दोन हात करण्यासाठी परळीतील या कोवीड योध्दात एखाद्या योध्दासारखे योगदान देत आहेत.

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार.ना. अजित पवार खा. सुप्रिया सुळे, ,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थामधील डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना केले जात आहे. परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून व त्यांच्या हातून या फेस शील्ड (मास्क) चे वाटप करण्यात येणार आहे. फेस शिल्ड मुळे डॉक्टर यांना या रोगाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळणार आहे..

‘कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे. खा. शरद पवार साहेबांच्या सुचनेवरून राज्यभरातील डॉक्टर कृतज्ञतापूर्वक 1,25,000 फेस शिल्ड चे वितरण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्य़ातीही सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून दिड हजार डॉक्टर प्रत्येकी दोन या प्रमाणे 3000 फेस शिल्ड देण्यात येणार आहेत. तसेच परळीतील डॉक्टर व पोलिस यांना 400 फेस शिल्ड लवकर वाटप करण्यात येणार असल्याचे माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *