धनगर आरक्षण प्रश्नी 19 सप्टेंबरला मातोश्री समोर सुंबरान आंदोलन करणार-दत्ता वाकसे

बीड/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील एक कोटी 40 लाख धनगर समाजाला गेल्या अनेक वर्षापासून विविध पक्षाकडून धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रश्न आश्वासनांची खैरात झाली आहे परंतु कोणत्याही सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा आरक्षण प्रश्न देण्याची भूमिका घेतली नाही त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पंढरपूर येथील मेळाव्याच्या प्रसंगी बोलताना सांगितले होते की राज्यामध्ये जर का आमचे सरकार आले तर धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करू परंतु दिलेल्या आश्वासनाचा मात्र विसर पडला आहे त्यामुळे त्यांना दिलेल्या आश्वासनाला व गेंड्याची कातडी घालून झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर सुंबरान आंदोलन करून सरकारला धारेवर धरणार असल्याचे धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे पुढे म्हणाले की राज्यातील विस बावीस संघटना एकत्र करून 19 सप्टेंबर रोजी मातोश्री समोर धनगर समाजाच्या वेशभूषा मध्ये ढोल गजी मेंढ्या घेऊन सुंबरान आंदोलन करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून डोंगरदऱ्यांमध्ये वाड्या वस्त्यावर करून स्वतःची उपजीविका भागवणाऱ्या धनगर समाजाला मात्र प्रत्येक सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणात निराश व्हावे लागत आहे घटनेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुष्ठ क्रमांक 36 व धनगर ओरान असा समावेश केला आहे परंतु राज्यातील काही नेतृत्वाने जाणून बुजून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचा काम केलेला आहे त्यामुळे आता गेंड्याची कातडी घेऊन झोपलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला जागे करण्यासाठी 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करून जागे करणार आहे अनेक वर्षापासून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीला घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरत आहे परंतु आता राज्यातील वीस ते बावीस संघटना एकत्र येऊन संबंध महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरणार आहेत असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे असे वाकसे म्हटले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स चे पालन करून आंदोलन करणार आहे राज्यांमध्ये वेळोवेळी धनगर समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रश्न तात्काळ अध्यादेश काढून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीला धरून आम्ही 19 सप्टेंबर रोजी मातोश्री समोर ढोल गजे मेंढ्या घेऊन झुंबरं आंदोलन करणार आहे असे देखील धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *