धनंजय मुंडे सह स्वियसहाय्यक कोरोना बाधीत ; संपर्कात आलेल्या व्यक्तीला 28 दिवस होम क्वाॅरंटाइन राहण्याचे प्रशासनाच्या सुचना..!!
सर्व पत्रकारांना विनंती आहे की ज्यानी जवळच्या संपर्कात आलेल्या किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केलेली किंवा मा. पालकमंत्री, त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या पी.ए. यांनी गेल्या चार दिवसांत संपूर्ण कुटुंबासमवेत २८ दिवस होम क्वारंटाईनची कडक निश्चिती केली पाहिजे आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय आरोग्य सुविधांना कळवावे… जिल्हाधिकारी राहुल रेखावार
परळी : राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांच्या स्वीय सहायकासदेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. परळीत जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह औरंगाबाद येथे 5 जुन रोजी आढळुन आली होती. त्यावेळी तिच्या कुंटूबीयांच्या संपर्कात ना.धनंजय मुंडे देखील आले होते. मात्र मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिक्स गटात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आढळुन आले हेते. त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणु निदान प्रयोग शाळेचे उद्घाटन देखील केले होते. आता मुंडे यांना करोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु या प्रयोग शाळेच्या उद्घाटनाला अनेकजण उपस्थित होते. या वृत्ताला बीडच्या आरोग्य प्रशासनाकडुन दुजोरा मिळत नसला तरी मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे. ना.मुंडे हे सध्या मुंबईत आहेत. असे वृत्त शहरातील एक वृत्तवाहिनीने प्रसिध्द केले आहे.