धक्कादायक! जन्मदात्या आईचाच दारुड्या मुलाने केला खून

बदनापूर (प्रतिनिधी) : माणुसकीला काळीमा फासणारी घटना बदनापूर तालुक्यात घडली आहे. एका दारुडया मुलाने आपल्या वृद्ध आईचा तीक्ष्ण हत्याराने गालावर व डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी फरार आहे. अन्साबाई बारवाल (वय ६०), असे मृत आईचे नाव आहे.लालवाडीतहत घाटी शिरसगाव येथील भागचंद दगडू बारवाल यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते पुतण्याच्या घराची वास्तूशांती असल्यामुळे त्याच्या घरी रात्री उशिरापर्यंत थांबले होते. या अवधीत संधी साधून त्यांचा दारूडा मुलगा गोपीचंद बारवाल (वय ३५) याने आई अन्साबाई बारवाल हिच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. गालावर व डोक्यावर जबर मारहाण केल्याने अन्साबाई यांचा मृत्यू झाला.
गोपीचंद याने आईची हत्या केल्यानंतर मामाच्या मुलाला फोन करून आपल्या आईला मारून टाकले, असे कळवून तो फरार झाला. गोपीचंदला दारूचे व्यवसन असल्याची माहिती मिळत असून, दारूच्या नशेमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्याने हा प्रकार केला. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक शामसुदंर कोठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी फरार आहे. आरोपी गोपचींद भागचंद बारवाल यांच्या विरुध्द भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *