धक्कादायक! कोविंड रुग्णालयाचा घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयावर गुन्हा दाखल!

पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे शासन आणि प्रशासन वेगवेगळ्या मोहीम हाती घेत असतानाच आरोग्यास घातक असा कचरा सार्वजनिक कचऱ्यात टाकल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी संत तुकाराम covid-19 उपचार रूग्णालयाच्या प्रमुखावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005. कलम 51 (b) महाराष्ट्र कोविंड- अधिनियम 2020 कलम 11, भारतीय दंड संहिता 1860 कलम 269, कलम 188 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ह्यूमन राइट्स जस्टीस असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर मुजावर यांनी देहू रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती त्या फिर्यादीत नागप्‍पा बिल्डिंगचे गोपाळ व्यंकोबा राव यांनी त्यांच्या इमारती शेजारील संत तुकाराम रुग्णालयातील कर्मचारी covid-19 रुग्णांचे वापरलेले साहित्य सार्वजनिक कचऱ्यात टाकत आहेत. असे कळविले होते त्यामुळे covid-19 रोगाचा प्रसार होऊन त्याची इतर लोकांना लागण होऊ शकते अशी माहिती दिल्याने व गंभीर बाब असल्याने स्वत: तनवीर मुजावर संघटनेचे संघटक सचिव चंद्रशेखर पात्रे मानव आधार सामाजिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रज्जाक शेख यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता रुग्णांना वापरलेले पी. पी. इ.किट हात मोजे. मास्क. इंजेक्शन. तसेच कोविंड रुग्णांच्या जेवणाच्या थाळ्या. व इतर असा कचरा जुने मुंबई-पुणे महामार्गाच्या उड्डाणपूल शेजारी रोडच्या कडेला असलेल्या सार्वजनिक कचराकुंडीत टाकलेला दिसला असता याची माहिती चंद्रशेखर पात्रे यांनी सदर घटनेबाबत देहूरोड पोलीस स्टेशनला कळविले तेव्हा संत तुकाराम कोळी उपचार रुग्णालयाची covid-19 रुग्णांचे साहित्य कचरा सार्वजनिक कचऱ्यात टाकल्यामुळे या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणखीन वाढु शकतो त्यामुळे संत तुकाराम covid-19 रुग्णालयाच्या व्यवस्थापका विरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे.
सदर घटनेची वार्ता ह्यूमन राइट्स जस्टीस असोसिएशन चे तनवीर मुजावर संघटनेचे संघटक सचिव चंद्रशेखर पात्रे मानव आधार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रज्जाक शेख यांनी देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांना कळविल्यानंतर त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली त्यांनी पोलिस उपनिरीक्षक संतोष येडे यांना सदर सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्याचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या व गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *