दोस्ती टी-हाऊस ते माँ साहेब चौक (वडारकॉलनी) रस्ता तात्काळ करा अन्यथा आमरण उपोषण करणार –विनायक शंकुरवार
परळी । प्रतिनिधी दोस्ती टी-हाऊस ते माँ साहेब चौक (वडार) कॉलनी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झालेली आहे. गुत्तेदारांनी अनेक वेळा बोगस कामे करून याची बिलं उचलली आहेत. या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात येऊन नविन रस्ता करावा अशी मागणी युवा कार्यकर्ते विनायक विश्वनाथ शंकुरवार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या भागातील त्रस्त नागरीकांना एकत्र घेवून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन मंगळवारी देण्यात आले. परळी शहरातील रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेमुळे नागरीकांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. दोस्ती टी हाऊस ते माँसाहेब चौक या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रभाग क्रमांक १३ मधील औद्योगीक वसाहत, माणिकनगर, वडसावित्री, मलिकपुरा आदी भागातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसांत हा रस्ता करा अन्यथा आम्ही या भागातील त्रस्त नागरीक नगर पालिकेसमोर अमरण उपोषण करणार आहोत असा ईशारा विनायक शंकुरवार यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी जयराम मेहरकर, नरसिंग अनलदास ,वैजनाथ कळसकर,योगेश पांडकर,गणेश बोडेवार, चैतन्य मानकर, अक्षय पालाकुडतेवार, कृष्णा आगलावे, ऋषी हरजुळे, गोविंद टेकाळे, बालाजी पुरभूज, अतुल गडेकर, श्रीकांत आंबुरे, विकास शेळके, नंदाबाई पुरबुज, संगीता शंकूरवार, सारिका टेकाळे, सिमाबाई आगलावे, सुनिता फेदेवार, माडेवार बाई ,मानकर, संगीता पालाकुडतेवार, लता हरजुळे, वंदना टेकाळे, चंद्रकलाबाई हांडे, मनकर्णा मेहरकर, ज्योती पेंडपवार, भाग्यश्री पेंडपवार आदीं उपस्थित होते…