Newsबीड जिल्हा

देशावरील कोरोनाचे संकट जावे म्हणून ; संकृतीक चळवळीतले दिपक तांदळे यांनी पवित्र रमजान उपवास धरला…!

परळी : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले असून प्रशासन पुर्ण ताकतीने जनतेच्या बचावासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या जगभरात पाक रमजान महिना सुरू आहे .रमजान निमित्ताने देशावरील कोरोना संकट जावे म्हणून संकृतीक चळवळीतले दिपक तांदळे यांनी आज तेरावा रोजा ठेवून रमजान साजरा केला. याप्रसंगी सर्व मित्र परिवारातर्फे त्याच सत्कार करून अभिनंदन करण्यात आले . रमज़ानचा महिना हा आनंद, सौहार्द आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. या महिन्याचे पावित्र्य सर्वांमधील स्नेहभावना अधिक वृद्धिंगत करो, ही सदिच्छा. रमज़ान मुबारक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *