दिलासादायक : डोल्हारा येथील महिलेची कोरोनावर मात
परतूर (प्रतिनिधी) – मुंबई प्रवासातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डोल्हारा येथील ४५ वर्षीय महिलेने कोरोनावर मात करून डिस्चार्ज देण्यात आल्याचे माहिती अधिकारी डॉ.ज्ञानदेव नवल यांनी दिली.
सदरील महिलेला दिनांक २५ मे रोजी कोव्हीड केअर सेंटर मॉडेल स्कुल आंबा रोड येथे दाखल करण्यात आले होते संपर्कात आलेल्या इतर पाच जणांचे सुद्धा लाळेचे नमुने प्रयोगशाळे कडे पाठवण्यात आले होते त्या सहा जणांपैकी ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता अन्य पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले होते सदरील महिलेवर डॉ.उनवणे,डॉ नवल,डॉ आंभुरे,डॉ सय्यद यांनी उपचार केले आज दिनांक ०८ जून रोजी त्या सहाही जणांना डिस्चार्ज देण्यात आले यावेळी डॉक्टर व इतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ReplyForward