दारू ने केला नाश ; मोठ्या भावा कडून लहान भावाचा खून

माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील पिंपळगाव ना. येथील गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे या दोन भावात दारू पिऊन झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात वार करून खून केला.
प्राथमिक माहितीनुसार लक्ष्मण दशरथ काळे वय २९ असे मृत युवकाचे नाव आहे तो अविवाहित आहे त्याला दारूचे व्यसन होते शनिवार रात्री दारूच्या नशेत लक्ष्मण व त्याच्या मोठ्या भाऊ गजानन यांच्यात वाद झाला याच वादात गजानन याने लक्ष्मणच्या डोक्यात कशानेतरी वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला
घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल गव्हाणकर व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला मृत्यू युवकाचा आईनेच पोलिसांना याबाबत खबर दिल्याने पोलिसांना घटनेची माहिती मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *