दारूच्या नशेत वृद्ध इसमाची आत्महत्या !
नेकनुर:-
येथून जवळच असलेल्या आंबील वडगाव येथे श्रीमंत मल्हारी पायाळ वय ६५ वर्ष यांनी आंबील वडगांव येथील काल रात्री आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ते रात्री खूप नशेत होते. नशेतच त्यानी आत्महत्या केल्याचे प्रथम अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना कळाल्यानंतर नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनेची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर प्राथमिक रुग्णालय मध्ये पाठवण्यात आले आहे. नेकनूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.