दहा संशयितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
बीड : कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकूण १७० कोरोना संशयितांचे नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी १७० नमुणे निगेटीव्ह आल्याने बीडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी दरोज संशयित येणारच त्याप्रमाणे आज पुन्हा जिल्हा रूग्णालयात ८ व अंबाजोगाई स्वाराती रूग्णालयात २ असे दहा संशियतांवर उपचार सुर असून सायंकाळी त्यांचा अहवाल आल्यानंतर समजेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन पाहिजे त्यापेक्षाही जास्त काळजी घेतांना दिसून येत आहेत. आष्टी येथील पॉझिटीव्ह आलेला रूग्ण नंतर दोन्हीवेळा निगेटीव्ह आला. ही अभिनंदनीय बाब असली तरी बीडला लागूनच जामखेड आहे. जामखेड तालुक्यात दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर बीडरांची चिंता पुन्हा वाढलेली दिसून येते. मात्र पोलीस प्रशासनाने त्या भागातील संपुर्ण हायवे व छोटे-मोठे वाडी, तांड्यातून येणारे रस्ते पुर्णत: सिल केले असून काही प्रमाणात बीड लवकरच ग्रीन झोन येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. सध्या दहा संशयितांवर उपचार सुरू असून संध्याकाळी त्यांचा अहवाल आल्यानंतर (पान २ वर)