त्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे आदेश..!

बीड : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोना बाधित रुग्ण येथील रुग्णालय परिसरात फिरताना एक व्हिडिओ आज( मंगळवार) रोजी व्हायरल झाला होता या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
ह्या व्हिडीओ मुळे आरोग्य विभागाकडून वारंवार सूचना करूनही हा रुग्ण नजर चुकवून फिरत असल्याचे उघड झाले आहे
कोरोणा बाधित रुग्णाने असे फिरणे अत्यंत धोक्याचे असून त्याच्यापासून कित्येकांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे यामागे नेमका कुणाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे याची चौकशी केली पाहिजे या गंभीर परिस्थितीत कोणत्याही निष्काळजी पणाची गय केली जाणार नाही असे ना. मुंडे म्हणाले

253 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *