….त्या महिलेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी माहिती लपवू नये ः तहसीलदार सुमन मोरे
मंठा (प्रतिनिधी) – मंठा तालुक्यातील पेवा येथील 1 संशयित महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला अल्याची माहिती आहे. मंठा तालुक्यात पेवा येथे मुंबई हुन आलेल्या एक 32 वर्षीय महीलेला कोरोना संशयित लक्षणे असल्याने तिला मंठा येथे (दि. 14) रोजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तिचा नमुना जि. सा. रुग्णालय जालना येथे तपासणी साठी पाठविण्यात आला होता. (दि. 15) रोजी रात्री उशीरा तो आवहाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
मंठा तालुक्यातील पेवा गावात (दि. 16) रोजी विभागीय पोलीस अधिकारी परतुर तसेच मंठा तहसीलदार श्रीमती सुमन मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपक लोणे, पोलीस निरीक्षक सतिश निकम, आरोग्य कर्मचारी पथक यांनी भेट देऊन सर्व गावाची माहिती घेतली. तसेच दि. 17 रोजी या गावात सात पथका मार्फत आरोग्य सर्वेक्षण पुढील 14 दिवस शिक्षक/आशा/आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत होणार आहे. जनतेने कुठल्याही बळी न पडता अफवांवर विश्वास ठेवू नये असे तहसीलदार सुमन मोरे यांनी सागीतले. आजपर्यंत मंठा शहरातील मॉडर्न स्कुल अलगीकरण कक्षात 28 जणांना नियंत्रणा खाली ठेवण्यात आले आहे. तसेच त्याचे आरोग्य पथका मार्फत देखरेख चालू आहे. तरी तालुक्यातील सर्व जनतेने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती मोरे यांनी केले.